भांडण केले आईने शिक्षा भोगतेय मुलगी

भांडण केले आईने शिक्षा भोगतेय मुलगी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भाईंदरच्या भारतनगरमध्ये हदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. यामध्ये आपल्या आईच्या भांडणाची शिक्षा तिच्याच चिमुरडीला झाली आहे. चार वर्षांच्या आफ्रिन शेखच्या आईसोबत झालेल्या किरकोळ भांडणाचा वाद मनात ठेऊन आरोपीने आफ्रिनचं अपहरण केलं आणि एका निर्जन स्थळी घेऊन जाऊन तिच्यावर लोखंडी हत्यारानं वार केला.

तिचा शोध घेतला असता आफ्रिन एका निर्जन स्थळी जखमी अवस्थेत सापडली. या चिमुरडीवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version