मनसे साधन सुविधा विभागाचा रविवारी (दि.११ मे) पाचवा वर्धापन दिन झाला. हा सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नद्यावरुन तसेच या वर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली. यावर त्यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचा सल्ला दिली. प्रशासनाच्या साधन सुविधेवरुनही ठाकरे यांनी सरकारला सुनावलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले,
मी जिथे जातो तिथे बरेच लोक प्रश्नं घेऊन येतात, आम्हीही ते प्रश्न सोडवतो. पण हीच लोकं मतदानाच्या वेळी कुठे जातात? जे तुमची पिळवणूक करतात त्यांच्याच हातात तुम्ही सत्ता देता मग माझ्याकडे कशाला येता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर्षी पावसात कोकणात दरडी कोसळू शकतात, त्यामुळे जी आपत्ती उद्भवेल त्यासाठी मनसेच्या नेमणूक केलेल्या कार्यकर्त्यांना मदतीसाठी तत्पर असणार आहेत. तसेच प्रशासनानेही या गोष्टीकडे लक्ष द्यावे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.