उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये मुख्यमंत्री पदावरून घेतलेल्या ताठर भूमिकेनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानक घडवून आणलेल्या शपथविधीमुळे खळबळ उडाली होती. मात्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलेले सरकार अवघ्या काही तासांतच कोसळून अजित पवार माघारी गेल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली होती. दरम्यान, पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी आणि त्यात असलेली शरद पवार यांची भूमिका याबाबत ‘पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता’ असे म्हणत अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.