अर्पिता तिवारी हत्येप्रकरणी मित्र अमित हाजराला अटक

अर्पिता तिवारी हत्येप्रकरणी मित्र अमित हाजराला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अँकर अर्पिता तिवारी हिच्या हत्येप्रकरणी मालवणी पोलिसांनी मित्र अमित हाजरा याला सोमवारी अटक केलीये. या रहस्यमयी मृत्यूप्रकरणी काही संशयितांची ‘पॉलिग्राफिक टेस्ट’ करण्यात आली होती. हाजराने पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबात आणि चाचणीदरम्यान दिलेल्या माहितीत तफावत आढळली. तसेच, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे हाजरावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

अर्पिता तिवारी हत्या प्रकरण अतिशय गुंतागुतिचे होते. पण, आता या हत्येप्रकरणी अर्पिताचा मित्र अमित हजराला अटक करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version