व्हायरल झालेल्या ऑडिओक्लीपमधील आवाज माझा आणि मोपलवारांचाच; ‘त्यांनी’ केला खुलासा

व्हायरल झालेल्या ऑडिओक्लीपमधील आवाज माझा आणि मोपलवारांचाच; ‘त्यांनी’ केला खुलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार आणि सतीश मांगलेंच्या क्लीपमुळे सध्या गदारोळ माजला आहे.

 

या प्रकरणी सतीश मांगले यांनी हा आवाज माझा आणि मोपलवारांचाच आहे असा खुलासा केला.

 

मी पैशांची अफरातफर केली असा आरोप करत मला अडकवलं जात आहे. या प्रकरणी सरकारकडे तक्रार करुनही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असा

खळबळजनक आरोप केला.

 

मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्ध महामार्गाचं काम मोपलवारांना देण्यात आले. मात्र, राधेश्याम मोपलवारांवरील सेटलमेंटच्या आरोपामुळे विरोधकांनी सरकारला

धारेवर धरलं आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. मात्र, सरकारने त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version