राज्यात लववकरच मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी हवामान अनुकूल असल्याने येत्या दोन दिवसांत मान्सून राज्यात धडकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यात एलनिनोच्या प्रभावामुळे मॉन्सून केरळमध्ये उशिरा दाखल झाला. दक्षिणेत काही भागात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात मॉन्सून कधी दाखल होणार या कडे बळी राज्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात येणारा मान्सून पुन्हा लांबणीवर पडला होता. मात्र, हे चक्रीवादळ त्याचा मार्ग बदलत असल्याने मुंबई किनारपट्टीला धडकण्याची शक्यता थोडी कमी झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सून दाखल होऊ शकतो. सध्या पश्चिम किनारपट्टीवरून मान्सूनची प्रगती सुरू असून, दुसरीकडे बांगलादेश जवळ कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पूर्वेकडून मान्सूनची प्रगती तुलनेने जास्त आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मान्सूनने केरळचा उर्वरित भाग, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग; तसेच ईशान्येकडील बहुतांश राज्ये व्यापली. हवामान अनुकूल असल्याने मान्सूनची पुढील दोन दिवसांत आणखी प्रगती करेल. सोमवारपर्यंत कर्नाटकचा, गोवा, महाराष्ट्राचा काही भाग मॉन्सून व्यापण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात सक्रिय असलेले बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून ६०० किमी पश्चिमेकडून संथ गतीने (ताशी तीन किमी) प्रवास करीत आहे. रविवारपर्यंत ते अत्यंत तीव्र चक्रीवादळाची श्रेणी गाठेल. पुढील २४ तासांत बिपरजॉय ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस वादळ वायव्येकडे प्रवास करेल अशी चिन्हे आहेत. हे वादळ सध्या पाकिस्तानकडे जाताना दिसत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.