महाराष्ट्र-केरळात मान्सून दाखल होणार

महाराष्ट्र-केरळात मान्सून दाखल होणार

भारतीय हवामान खात्याने आता मान्सून तीन ते चार दिवस उशीराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये ४ जून तर महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. पण अद्याप केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनची प्रतिक्षा लांबली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम मान्सून आता लक्षद्विपपर्यंत पोहोचला आहे. तर राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले आहे.

उकाड्याने आणि कडाक्याच्या उन्हाने हैराण होऊन बसलेल्या तसंच शेतीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. पण आता मान्सून तीन ते चार दिवस उशिराने येणार असल्याने महाराष्ट्रातही पावसाला विलंब होणार आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये ७ ते ८ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात साधारणपणे १३ ते १५ जून दरम्यान पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version