Monsoon Update: मान्सून आगमनाबद्दल हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, शेतकऱ्यांना देखील केलं महत्त्वाचं आवाहन

त्याचप्रमाणे हवामान विभागाने काही भागांत वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर पेरणीबाबत मोठा प्रश्न उभ राहिला आहे. 
Monsoon Update: मान्सून आगमनाबद्दल हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, शेतकऱ्यांना देखील केलं महत्त्वाचं आवाहन

सध्या वातावरणात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात सध्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्याचप्रमाणे हवामान विभागाने काही भागांत वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर पेरणीबाबत मोठा प्रश्न उभ राहिला आहे. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ,मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेश या भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात. 

हेही वाचा – Monsoon Delayed in India: मान्सूनची वाटचाल मंदावली; केरळमध्ये आगमनाला उशीर, जून-जुलैतही उकाड्याचा जोर कायम राहण्याची शक्यता 

आज, 1 जूनपासून राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस अधिकृत मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व स्वरूपाचा आहे. त्यामुळे सध्या जे हवामान आहे त्यानुसार, राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची  शक्यता नाही, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची  घाई करू नये, असे आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

हेही वाचा – Mumbai Local:आता जास्त वादळीवारा, पाऊस झाला तरी अडकण्याची भीती नाही, मुंबईकरांच्या सुस्साट प्रवासासाठी प्रशासनानं केलं मोठं काम 

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या राज्यात होत असलेल्या वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही थेट संबंध नाही.मान्सून अद्याप केरळात पूर्णपणे दाखल झालेला नसल्याने, महाराष्ट्रात त्याचे आगमन होण्यास किमान 10 जून उजाडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version