पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात नवीन संसदेच्या निर्माणाधीन इमारतीला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. हे काम पूर्ण होत आले असून यंदाचे पावसाळी अधिवेशन नव्या संसद भवनात होईल, अशी अपेक्षा आहे. जुलै-ऑगस्ट या महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशन बोलावले जाईल.
2024च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्राचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. अयोध्येतील राममंदिराचे लोकार्पण दिवाळीच्या सुमारास होणार आहे. तर, नवीन संसद भवनाची इमारतही तयार होण्याच्या मार्गावर असून संसदेचे पुढील पावसाळी अधिवेशन नवीन इमारतीत व्हावे यासाठी कामांना गती दिली जात आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद इमारतीचे निरीक्षण केले. तर, येत्या एक-दोन महिन्यांमध्ये नव्या संसद इमारतीचे काम पूर्ण होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे नवीन संसदेचा शुभारंभ करतील.
सध्या, लोकसभेत 545 तर राज्यसभेत 250 सदस्य आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या 770 आणि राज्यसभेत 530 अशी या संसद भवनाची क्षमता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.