बुधवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

बुधवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजे १७ ऑगस्ट पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्यात सत्तस्थापना,गटबाजी या राजकीय नाट्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक पहिल्यांदाचं आमनेसामने येणार आहेत. म्हणून यावेळचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गेल्या अनेक दिवसात विरोधकांकडून मंत्रीमंडळ विस्तार खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर कडाडून टीका होताना दिसली. पण आता मंत्रीमंडळ स्थापनेसह खातेवाटप नंतर नवनिर्वाचित सरकारचं हे पहिलं वहिल्या अधिवेशनातून राज्याच्या जनतेला काय मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तरी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला म्हणजे आज शिंदे फडणवीस सरकार मधील नवनिर्वाचित मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडणार आहे.

आज संध्याकाळी ५ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार चहापान कार्यक्रम पार पडला आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडाळाच्या बेठकी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पत्रकार परिषद घेणार आहेत.

यावेळी पावसाळी अधिवेशन ६ दिवसांचं म्हणजे १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या दरम्यान पार पडणार आहे. गेल्या वर्षी महाविकास आघाडी अधिवेशन केवळ २ दिवसात आटोपण्यात आलं होतं. तरी यावेळी राज्यातील संपूर्ण जनतेचं होणाऱ्या या अधिवेशनाकडे लक्ष लागलेलं आहे. १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांची नामनियुक्त यादी जाहीर करण्यात आली. तसेच २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version