दक्षिण अंदमानात मान्सून धडकला..

दक्षिण अंदमानात मान्सून धडकला..

नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अंदमानात तीन दिवस आधीच मान्सून दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले. पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती देण्यात आली आहे तर ४ जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार आहे.

साधारण २२ मे रोजी मान्सून हा अंदमानात दाखल होत असतो. या वर्षी मात्र तीन दिवस आधीच हा मान्सून दाखल झाल्याचे चित्र आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन चार दिवस उशिरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. त्यामुळे दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून हा या वर्षी ४ जून रोजी दाखल होणार आहे.

दरम्यान, स्कायमेट या खाजगी एजन्सीच्या अंदाजानुसार, अंदमानात मान्सून उशिराने दाखल होणार आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत असून, तो विलंबाने दाखल होईल. तसेच, महाराष्ट्रात 9 जून आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज असला तरी, 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान दक्षिण भारतीय महासागर परिसरात एक चक्रीवादळ तयार होत असल्याने बाष्प तिकडे ढकलले जातील. अशात मादागास्कर परिसरात उच्च दाब तयार होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचे ढग तयार होण्यास उशीर होण्याचा अंदाज आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version