मान्सून केरळात दाखल, राज्यात कधी येणार मान्सून?

मान्सून केरळात दाखल, राज्यात कधी येणार मान्सून?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. पाऊस येण्यास पोषक वातावरण तयार झाल्यानंतर अखेरीस मान्सून केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर दाखल झाला.

 

मान्सून आज केरळच्या समुद्रकिनारी पोहोचेल आणि पुढील 24 तासात केरळच्या बहुतांश भागात तसंच तामिळनाडूमध्ये दमदार पावसाची शक्यता आहे.

 

केरळबरोबरच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, तमिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, उत्तरपूर्व भारताच्या काही भागात येत्या 24 तासांत प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल स्थिती आहे.

 

दरम्यान, महाराष्ट्रातही मान्सून वेगाने दाखल होईल अशी चिन्हं आहेत. 2 ते 4 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला असून, येत्या २४ तासांत दक्षिण कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version