Weather Update: रखडलेली पेरणी पुन्हा सुरु होणार! राज्यात मान्सूनला सुरुवात; पुढील चार दिवस अलर्ट जारी

राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मॉन्सून पुणे, लातूर, धाराशिव, आलिबागपर्यंत पोहोचला आहे. मुंबईतही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे.
Weather Update: रखडलेली पेरणी पुन्हा सुरु होणार! राज्यात मान्सूनला सुरुवात; पुढील चार दिवस अलर्ट जारी

राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मॉन्सून पुणे, लातूर, धाराशिव, आलिबागपर्यंत पोहोचला आहे. मुंबईतही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उष्णतेने हैराण नागरिकांना दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट असेल. तर विदर्भात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट असेल. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आणि सिंधुदुर्ग भागात आज पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात काही भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे.

सिंधुदुर्गात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून काल मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. सह्याद्री पट्ट्यात तसेच पायथ्याशी असलेल्या भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. तसेच मध्यरात्री 2 वाजल्यापासून पहाटेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. तर रायगड येथे माणगावातही जोरदार पाऊस आहे. सकाळपासून पावसाने थोडीशी विश्रांती घेतले असून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आहे. यावेळी हवामान विभागाने पुढील चार दिवसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. बळीराजा दमदार पावसामुळे सुखावला असून पुन्हा एकदा शेतीचे कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान कोकणात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

हेही वाचा- Gokul Gite In Shivsena : अपक्ष आमदार गोकुळ गीते शिवसेनेचे सहयोगी सदस्य; एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर गीतेंची भूमिका स्पष्ट

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत ताशी 30-40 किमीने वारे वाहत असून वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील ​धुळे जिल्ह्यात पावसाच्या पहिल्याच हजेरीसोबत आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले असून नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वादळी वाऱ्यांचा अंदाज आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पेरण्या रखडल्या होत्या. अखेर शेतकरी पेरण्या करू शकतात. कोकणात आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version