उष्णतेला माकडेही त्रासली,पाहा व्हायरल व्हिडिओ

उष्णतेला माकडेही त्रासली,पाहा व्हायरल व्हिडिओ

मुंबई, २७ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : ऊन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे सर्वचज हैराण झाले आहेत. कडक ऊन्हामुळे जो तो आपल्या परीने या ऊन्हापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे . माणसेच नाही तर आता प्राणी देखील या ऊन्हाला त्रासली आहेत.नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चक्क एक माकडांची टोळी उष्णेतेपासून वाचण्यासाठी पाण्यात डुबकी मारत आनंद लुटताना दिसत आहे.


उष्णेतेपासून बचाव करण्यासाठी आपण बऱ्याचदा दिवसातून २ वेळा अंघोळ करतो. गावाकडे तर काही लोक गावाजवळून वाहणाऱ्या नदी किंवा तलावात आंघोळ करून आपले शरीर थंड ठेवतात.अशातच शरीर थंड ठेवण्यासाठी काही माकडे पाण्याच्या टाकीत उड्या मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधू लागला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत शहरी भागात राहणारी काही माकडे पाण्याच्या टाकीचे झाकण उघडून अंघोळ करतानादिसत आहेत. एका पाठोपाठ एक माकड पाण्याच्या टाकीत उतरुन गार पाण्याने अंघोळ करत आनंद लुटताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील एका मीम पेज ने शेअर केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version