जानेवारीपासूनच चाखा हापूसची चव

जानेवारीपासूनच चाखा हापूसची चव

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

कोकणाच्या राजाची अर्थातच हापूसची सगळ्याच खवय्यानं उत्कंठा लागलेली असते. मात्र, यंदा चक्रीवादळाचं संकट कडाक्याची थंडी लांबलेला पाऊस या सर्व गोष्टींमुळे आंब्याच्या पिकावर परिणाम झाल्याचे दिसून येते. वाढत्या धुक्यामुळे मोहर गळण्याचे संकट असल्याने यंदा आंबा मार्च नंतरच मोठ्या प्रमाणात मिळणार अशी शंका होती.

मात्र, रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन जानेवारी मध्येच हापूसचे पिक मोठ्या प्रमाणात घेण्याची व तो बाजारात आणण्याची किमया देखील करून दाखवली. म्हणूनच, आता आंबा खाणाऱ्यांना जानेवारी पासूनच हापूसची चव चाखायला मिळणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version