संजय राऊतांच्या आरोपांना मोहित कंबोज यांचे प्रत्युत्तर

संजय राऊतांच्या आरोपांना मोहित कंबोज यांचे प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, संजय राऊत दरवर्षी माझ्या घरी गणपतीला येताता. तर गरजेवेळी मी संजय राऊतांना आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे संजय राऊत मला ओळखत नाही, हे त्यांचे म्हणणे खोटे असून त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार असल्याची टीका मोहित कंबोज यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार असून आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे मोहित कंबोज यांनी स्पष्ट केले आहे. मोहित कंबोज म्हणाले, मी माझ्यावर केलेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर देणार आहे. संजय राऊत यांनी मला देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा बॉय म्हटले आहे. तर संजय राऊत हे नेमके कुणाचे आहेत? असा सवाल उपस्थित करत राऊत हे उद्धव ठाकरेंचे आहेत की शरद पवारांचे आहेत, हे त्यांनी सांगावे. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे, असे ते म्हणाले.

ग्रँड हयात आणि संजय राऊत यांचा काय संबंध आहे? समगलर लोकांसोबत संजय राऊत यांचा काय संबंध आहे? तसेच संजय राऊत यांचा किती कट आहे? संजय राऊत यांनी कॅशमध्ये किती पैसे घेतले? असे अनेक सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version