जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सरसंघचालक मोहन भागवतांनी केलेल्या वक्तव्यावर नवा वाद निर्माण झालाय. भारतीय लष्कराला सैन्य तयार करण्यासाठी सहा ते सात महिने लागतील. पण देशाला गरज पडल्यास राज्यघटनेनं परवानगी दिल्यास केवळ तीन दिवसात सैन्याची उभारणी करण्याची क्षमता संघाकडे आहे, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलय.
देशासाठी लढू इतकं म्हणाले असते तर कदाचित वादाची किनार मिळाली नसती मात्र संघाच्या सैन्य उभारणीच्या क्षमतेवर बोलल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जातेय.
देशाला गरज भासली आणि राज्यघटनेने परवानगी दिली तर आम्ही सीमेवर लढायला तयार आहोत, असं भागवत म्हणालेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.