मोदी ठरवणार २०२४ साठीचा नवा संघ

मोदी ठरवणार २०२४ साठीचा नवा संघ

नवी दिल्लीत सोमवारी भाजपची दोन दिवसीय बैठक सुरु झाली. २०२४ लोकसभा निवडणुकीचीच्या तयारीसाठी ही बैठक घेण्यात आली आहे.

दिल्लीतील एन् डी एम् सी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सोमवारी १६ जानेवारी २०२३ रोजी भाजपाची बैठक सुरु झाली. या बैठकीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांसह भाजपचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते. जवळ जवळ ३५ मंत्री, निवडणूक येऊ घातलेल्या ९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीस उपस्थित होते.

‘२०२४ च्या निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागायचं आहे, आम्हाला एकही निवडणूक हरायची नाहीये, जिथे आमचं सरकार आहे तिथे मजबूत व्हायचं आहे तर जिथे आमचं सरकार नाहीये तिथे जास्त मजबूत व्हायचं आहे’, असं म्हणत वरिष्ठ भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी भाजपच्या दिल्लीतल्या बैठकी मागचं उद्दिष्टच स्पष्ट केलं आहे.

२०२३ वर्षात नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणूका आहेत तसेच २०२४ वर्षात लोकसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे त्याच्या मोर्चेबांधणीसाठी ही बैठक घेतली जात आहे, अशी चर्चा रंगली आहे. या बैठकीनंतर २०२३ च्या विधानसभा निवडणूक आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक यांच्या अनुषंगाने संघटनात्मक बदल घडण्याची दाट शक्यता आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version