पंतप्रधान मोदींनी 3 वर्षात 44 देशांच्या दौऱ्यात केलेल्या कोट्यवधी रूपये खर्चाची परदर्शक माहिती

पंतप्रधान मोदींनी 3 वर्षात 44 देशांच्या दौऱ्यात केलेल्या कोट्यवधी रूपये खर्चाची परदर्शक माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये केलेल्या 44 देशांच्या दौऱ्यांसाठी सुमारे 275 कोटी रुपयांहून अधिक खर्च आल्याची माहिती पीएमओ कार्यालयाने बुधवारी जाहीर केली.

 

यामध्ये सर्वाधिक म्हणजे ३१ कोटी रुपयांचा खर्च एप्रिल २०१५मधील फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाच्या दौऱ्यावर झाला. पारदर्शकतेसाठी काही महत्त्वाच्या बाबींचा तपशील स्वत:हून प्रसिद्ध करण्याची पद्धत ‘पीएमओ’ने सुरू केली.

त्यानुसार मोदींनी गेल्या तीन वर्षांमध्ये 27 परदेश दौरे केले, 44 देशांना भेटी दिल्या, त्यासाठीचा खर्च 275 कोटींहून अधिक आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version