भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकण्याचा निर्णय दिला आहे. यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर सणसणीत टीका केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटबंदी जाहीर केली होती. देशातल्या ५०० आणि १,००० रुपयांच्या चलनी नोटा त्या दिवसापासून व्यवहारातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर केंद्र सरकारने ५०० आणि २,००० रुपयांच्या दोन नवीन चलनी नोटा बाजारात आणल्या होत्या. यापैकी २,००० रुपयांची नोट आता बंद करण्यात आली आहे. ‘पंतप्रधान मोदींनी आता स्वतः वधस्तंभाकडे जावे’ अशी संजय राऊतांनी जहरी टीका केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.