‘नरभक्षकाप्रमाणे मोदी सत्ताभक्षक’

‘नरभक्षकाप्रमाणे मोदी सत्ताभक्षक’

के.सी. वेणुगोपाल यांनी दि.१७ एप्रिल रोजी मातोश्रीवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी पत्रकार परिषदेचे ही आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशाला हुकूमशाहीचा धोका आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तर लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस शिवसेना ठाकरेंसोबत आहे असे काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीला यावे मग राहुल गांधी मातोश्रीवर येतील , असे ही के.सी. वेणुगोपाल म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार का हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.

काँग्रेस नेते वेणुगोपाल म्हणाले की,” देशातील राष्ट्रीय राजकारणात उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने खंबीर उभे आहेत आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत. तसेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकजुटीसाठी प्रयत्न करत आहोत. सत्ताधारी विरोधकांना हुकुमशाही असल्याची जाणीव करून देत आहे. विरोधकांचे विचारधारा वेगळी असली तरी देशाला लोकशाही वाचविण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे.”

उध्दव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “सध्या देशासमोरील अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. या फोडाफोडीविरोधात विरोधकांचे समिकरण सुरू आहे. देशात विविध पक्ष आणि त्यांची विचारसरणी आहे. या पक्षांना एकत्रितपणे घेऊनसोबत जायचे आहे. त्याला लोकशाही म्हणतात. भाजप हाच एकमेव पक्ष राहील असे भाजपच्या अध्यक्षांनी म्हटले होते. ही भूमिका घातक आहे. शिवसेना या देशासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे.” असेही उद्धव यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “आम्ही मैत्री निभावतो तेव्हा संबंध जोडतो. भाजपसोबत 25 वर्ष युती होती. पण त्यांना मित्र कोण, शत्रू कोण हे कळलं नाही. वेणुगोपाल यांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही जेव्हा मैत्री जपतो तेव्हा ती फक्त मैत्री राहत नाही तर एक नातं असतं. आपण देशाच्या लोकशाहीसाठी एकत्र लढू. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.”

लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सर्वांनी सोबत राहणे गरजेचे आहे,असे ही वेणुगोपाल म्हणाले. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल मातोश्रीवर दाखल झाले. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा झाली. तसेच वेणुगोपाल यांच्यासोबत भाई जगताप, बाळासाहेब थोरात, चरणसिंग सप्रा हे देखील मातोश्रीवर दाखल झाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version