मोदींच्या वक्तव्याने कॉर्पोरेट जगतात खळबळ; 3 लाख कंपन्यांचे व्यवहार संशयास्पद असल्याचा केला गौप्यस्फोट

मोदींच्या वक्तव्याने कॉर्पोरेट जगतात खळबळ; 3 लाख कंपन्यांचे व्यवहार संशयास्पद असल्याचा केला गौप्यस्फोट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

देशभरात जीएसटी (GST)ची अंमलबजावणी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रथमच यासंदर्भात भाषण केले. नवी दिल्लीत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड

अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

परदेशातील काळा पैशाविरोधात केलेल्या कारवाईचा काय परिणाम होत आहे, याची माहिती स्विस बँकेतील ताज्या आकडेवारी मिळत आहे. स्विस बँकेतील भारतीयांचा

पैसा 45 टक्क्यांनी कमी झाल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितले. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे

 

 – सीए समाजाचे आर्थिक डॉक्टर

– जसे डॉक्टर शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतात, तसेच चार्टर्ड अकाऊंटंट्सवर समाजातील आर्थिक स्वास्थ्याची जबाबदारी आहे.

–  सीए अर्थशास्त्राचा मोठा स्तंभ आहे.

– जगभरात भारतातील चार्टर्ड अकाऊंटंट्सना त्यांच्या उत्कृष्ट आर्थिक कौशल्यासाठी ओळखले जाते. 

– नवीन चार्टर्ड अकाऊंटन्सी करिक्युलम कोर्सचा प्रारंभ करण्याची संधी मला मिळाली.

– नोटाबंदीचा निर्णय काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात मोठं पाऊल होतं

– 2013 मध्ये स्विस बँकेत भारतीयांचा पैसा 42 टक्क्यांनी वाढला, आता तो 45 टक्क्यांनी कमी झाला.

– परदेशात काळा पैसा जम करण्यांसाठी आणखी अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे.

– देशात मी एकीकडे स्वच्छता अभियान आणि अर्थव्यवस्थेत सफाई अभियान चालवत आहे.

– 3 लाखांपेक्षा अधिक नोंदणीकृत कंपन्यांची देवाणघेवाण चौकशीच्या फेऱ्यात आल्या आहेत. हा आकडा आणखी किती वाढेल हे सांगू शकत नाही. 

– 48 तासांपूर्वीच एक लाख बोगसकंपन्यांना टाळं ठोकण्यात आले.

– नोटाबंदीनंतर 3 लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत कंपन्यांची देवाणघेवाण चौकशीच्या घेऱ्यात आल्या आहेत.

– नियम मोडणाऱ्या कंपन्यांवर येत्या काळात आणखी कठोर कारवाई करणार.

 – गेल्या 11 वर्षात केवळ 25 सीएंविरोधात कारवाई झाली आहे. केवळ 25 जणांनी घोटाळा केला का?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version