#CAA वरुन शहरी नक्षलवाद्यांकडून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न – नरेंद्र मोदी

#CAA वरुन शहरी नक्षलवाद्यांकडून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न – नरेंद्र मोदी

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर फोडला. आफल्या भाषणात त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीमधील मेट्रोची समस्या, पाण्याची समस्या यांवर बोलून समस्या रखडवत ठेवणं हे आमचे संस्कार नाही, असं म्हटलं. दिल्लीकरांना आता खोटी आश्वासन मिळणार नाही. दिल्लीत अनधिकृत घरं अधिकृत केली. आधी काही लोक या कामाला 2021 पर्यंतचा वेळ लागेल असं म्हणत होते, आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत दिल्लीतील कॉलनींचं विधेयक पारित केलं. ज्या लोकांवर तुम्ही घरं नावावर करण्यासाठी विश्वास ठेवला ते काय करत होते, दिल्लीवासीयांनी हे लक्षात ठेवावं अशीही आठवण मोदींनी दिली.

मेट्रोच्या फेज 4 च्या कामात दिल्ली सरकारने राजकारण केलं, तसं झालं नसतं तर हे काम खूप आधीच पूर्ण झालं असतं.

एकीकडे आम्ही VIP लोकांची घरं रिकामी केली, दुसरीकडे 40 लाख सामान्य लोकांना घरं दिली. माझ्यासाठी तुम्ही सर्व लोकच VIP आहात.

शहरातील प्रदुषण कमी होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत

दिल्लीत मागील 5 वर्षात अनेक सीएनजी स्टेशन बनवले आहेत. 

यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल (Citizenship Amendment Act) स्पष्टीकरण देत ‘धन्यवाद रॅली’ला संबोधित केलं.

#CAA वरून विरोधकांवर निशाणा-

CAA मंजुरीसाठी सर्वांनी मदत केली

नागरिकत्व दुरुस्ती कायदा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे.

हिंदू, शीख, पारशी लोकांना त्यांचा हक्क मिळाला

खोटे व्हिडीओ बनवून जनतेला भडकवण्याचे काम केलं

नागरिकत्व कायद्यावरुन भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.

शिकले सवरलेले शहरी नक्षलवादी आणि काँग्रेसी लोक #CAA #NRC विरोधात अफवा पसरवत आहेत.

जे हिंदुस्तानाच्या मातीतील मुसलमान आहेत, त्यांचं #CAA आणि NRC शी काहीही देणंघेणं नाही. ना त्यांना कोणत्याही डिटोन्शन सेंटरमध्ये पाठवलं जाणार नाही.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या सन्मानासाठी आहे.

दीड कोटीहून अधिक घर देताना आम्ही कधीही धर्म पाहिला नाही.

आम्ही फक्त धर्म पाहतो. उज्ज्वला योजनेत गॅस जोडणी देताना आम्ही धर्म पाहिला नाही.

कुठल्याच योजनेसाठी जाती-धर्म पाहिला नाही.

तुमचा जो काही राग आहे, तो माझ्यावर काढा. पण गरीबाची रिक्षा जाळू नका, त्यांच्या झोपड्या जाळू नका, असं आवाहनही मोदींनी आंदोलकांना केलं.

माझा पुतळा जाळा. पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नका.

पोलिसांवर का हल्ले केले जात आहेत? स्वातंत्र्यांनंतर आजपर्यंत 33 हजार पोलिसांनी देशासाठी बलिदान दिलंय. पोलीस जनेतसाठी असतात. त्यांच्यावर हल्ले करू नका. संकटाच्या काळात पोलीसच मदतीला येतात.

जे हिंदुस्तानाच्या मातीतील मुसलमान आहेत, त्यांचं #CAA आणि NRC शी काहीही देणंघेणं नाही. ना त्यांना कोणत्याही डिटोन्शन सेंटरमध्ये पाठवलं जाणार नाही.

पाकिस्तानातून येणाऱ्या शरणार्थींंचा विचार करायला हवा. त्यांच्यावर पाकिस्तानात अत्याचार होत आहेत.

भारताला जगभरात बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे.

मोदींचं नाही, निदान महात्मा गांधींचं तरी ऐका. त्यांनी म्हटलं होतं, फाळणीनंतर जे हिंदू भारतात येऊ इच्छितात, त्यांचं स्वागत आहे.

काही लोक अजूनही गांधी आडनावाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही संसदेत बांग्लादेशातील शरणार्थींसाठी CAA कायद्याची आवश्यकता विदीत केली होती. आसमचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगई, राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पं बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शरणार्थींच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. मात्र आता विरोधक रंग बदलत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version