वृत्तसंस्था, मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खिल्ली उडवणारे मीम ट्विट केल्याने ‘एआयबी’ अडचणीत सापडले आहे. ‘एआयबी’विरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला
आहे.
तर ‘आम्ही विनोद करत राहणार आणि आवश्यकता वाटल्यास आम्ही ते ट्विट डिलीटही करु’ असे एआयबीच्या तन्मय भटने म्हटले.
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणाचा तपासही सुरु केला. दरम्यान नेटकऱ्यांनीही या ट्वीटबद्दल तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या
आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.