वृत्तसंस्था, नवी दिल्ली
उडत्या विमानात शुक्रवारी सिटखालील बॅगेत मोबाईल फोनचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. हे विमान दिल्लीहून इंदौरला जात असताना ही घटना घडली.
बॅगेतून धूर निघत असल्याचं दिसताच विमानातील प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. मात्र, यात सुदैवानमे कोणतिही जीवीतहानी झालेली नाही.
तात्काळ विमानातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी अग्निरोधक आणलं. पण, धक्कादायक बाब म्हणजे हे अग्निरोधक चाललंच नाही. त्यानंतर बॅगेवर पाणी टाकून आग विझवण्यात आली.
आग विझवण्याची योग्य सुविधा नसल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. हा मोबाईल विमानात प्रवास करणाऱ्या अप्रिता ढळ यांचा होता. अधिक तपास करण्यासाठी स्फोट झालेला मोबाईल ताब्यात घेण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.