जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
महाराष्ट्र बंददरम्यान उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद करण्यात आलीये.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी हे आदेश दिलेयेत. समाजामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या मेसेज आणि व्हिडीओंचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार होऊन, जातीय तेढ निर्माण होईल. त्याद्वारे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघडेल यामुळे 3 जानेवारी 2018 रोजी रात्री 8 वाजल्यापासून 4 जानेवारी 2018 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीये असं प्रशासनामार्फत सांगण्यात आलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.