जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज ठाकरेंची साथ सोडून मनसेच्या सहा नगरसेवकांनी काही शिवसेनेत प्रवेश केला. आता या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांची पून्हा मनसेत घरवापसी होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत गेलेल्या चार नगरसेवकांनी पून्हा मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या चारही नगरसेवकांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मनसेच्या सुत्रांनी दिली.
यामुळे आता राज ठाकरेंच्या भूमिकेकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या नगरसेवकांशी संपर्क झाला असून त्यांच्याशी चर्चा सुरु आहे, तसंच या नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे, असाही दावा मनसेकडून करण्यात आला आहे.
मुंबईतील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर 13 ऑक्टोबरला मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेते गेले होते. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
भाजप तसेच मनसेने शिवसेनेने नगरसेवक फोडल्याचा आरोप केला. इतकचं नाही तर राज ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.
शिवसेनेसोबत गेलेले ‘मनसे’ नगरसेवक…
प्रभाग क्र. 126 अर्चना भालेराव
प्रभाग क्र. 133 परमेश्वर कदम
प्रभाग क्र. 156 अश्विनी मतेकर
प्रभाग क्र. 163 दिलीप लांडे
प्रभाग क्र. 189 हर्षला मोरे
प्रभाग क्र. 197 दत्ताराम नरवणकर
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.