मनसेचा मराठीपणा गेला कुठे? आंदोलन कार्यकर्त्यांच्या अंगलट

मनसेचा मराठीपणा गेला कुठे? आंदोलन कार्यकर्त्यांच्या अंगलट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठी पाट्या न लावता इंग्रजी पाट्या लावणाऱ्या दुकानदारांच्या फलकाला मनसेने काळे फासत आंदोलन केले.

 

पण,  हेचं आंदोलन आता मनसेच्या चांगलचं अंगलट आल्याची घटना कल्याणमध्ये घडली. मनसेने हे आंदोलन कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या पुढाकाराने केले.

 

परंतु, देसाई कुटुंबियांच्या हॉटलेवरचा फलकचं चक्क इंग्रजीत असल्याचं पाहायला मिळाले. या फलकाकडे दुर्लक्ष करून इंग्रजीत असलेल्या फलकाला देसाई यांनी ना काळं फासलं ना काठी ठोकली.

 

मनसेच्या या आंदोलनामुळे मनसे आता टिकेचे लक्ष्य ठरली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version