१५ जुलै, २०२४ मुंबई : ठाण्यातल्या वाढलेल्या खड्ड्यांच्या विरोधामध्ये सोमवारी १४ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खड्ड्यामध्ये उभे राहून आंदोलन केलं आहे. या आंदोलनावेळी मनसे कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली आहे.
रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि या खड्ड्यांमुळे होणारे अपघात वाहतूक कोंडी या सर्वांना रोखण्यासाठी मनसेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरांमध्ये अशा प्रकारचे पडलेले खड्डे हे जीवघेणे आहेत आणि हा प्रकार रोखण्यासाठी महानगरपालिका काहीच करत नाहीये असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.