मनसेचं चायना मोबाईलविरोधात आंदोलन

मनसेचं चायना मोबाईलविरोधात आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

मनसेने चायना मोबाईल कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

 

अहमदनगरमध्ये बस स्थानकात लावण्यात आलेले फ्लेक्स फाडून निषेध नोंदवण्यात आला. याआधीच अहमदनगरमधील मोबाईल विक्रेत्यांनी चायना कंपन्यांचे मोबाईल

विकू नयेत आणि बोर्ड काढून टाकावेत असा इशारा देण्यात आला होता असं मनसेचं म्हणणं आहे.

 

राज्य सरकार एसटी महामंडळाच्या स्थानकात चायना कंपनीचे बोर्ड लावतय आणि त्याला आपला विरोध असल्याचं मनसेचे नितीन भुतारे यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version