गेल्या काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाचं दुखणं वाढल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे राज ठाकरे काही दिवसांपासून विश्रांती घेत आहेत. पण आता येत्या काही महिन्यांत होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.
आगामी मुंबई आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुंबई विधान सभानिहाय स्वतः आढावा बैठक घेणार आहेत. मंगळवारी ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत. या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर चर्चा केली जाणार आहे.
ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत. ही बैठक आज शिवतीर्थावर होणार आहे. या बैठकीत संघटनात्मक बांधणी तसेच सध्याची पक्षीय स्थिती, स्थानिक परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच मुंबई महापालिकेसाठी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.