जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रक्षाबंधनला बहीण भावाला ओवाळून राखी बांधून आपली रक्षा करण्याची अपेक्षा भावाकडून करते.
मात्र, मुंबईत यावेळी भावानं बहिणीला ओवळणीत चक्क कांद्याची भेट दिली आहे.
मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी आपल्या विभागातील महिलांकडून राखी बांधून घेतल्यानंतर 3 किलो महिलांना ओवाळणी म्हणून कांद्याची भेट दिली.
आवश्यक असलेली ही कांद्याची भेट मिळाल्याने बहिणी आनंदित झाल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.