ठाणे सिव्हिल रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणी मनसेचं आंदोलन

ठाणे सिव्हिल रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणी मनसेचं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ठाण्यातील बाळ चोरीच्या प्रकरणानंतर सिव्हील रुग्णालयाचे सिव्हील सर्जन जागेवर नाही, असा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं.

रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी मनसेनं केलीय. मनसे कार्यकर्त्यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नाकोडे यांना घेराव घातला होता.

दरम्यान, ठाणे पोलिसांची 4 पथकं बाळ चोरीच्या प्रकरणी तपास करताहेत. याप्रकरणी पोलीस cctv आणि मोबाईल लोकेशन द्वारे तपास करताहेत.

या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर जिल्हा शैल्य चिकित्सा अधिकारी कारवाई करतील, असं यावेळी सांगण्यात  आलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version