फेरीवाल्यांपासून 2 हजार कोटींचा हफ्ता घेतला जातो; मनसेचा गंभीर आरोप

फेरीवाल्यांपासून 2 हजार कोटींचा हफ्ता घेतला जातो; मनसेचा गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सोमवारी मनसेच्या शिष्टमंडळानं मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ तयार करण्यात आलं होतं.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानकांवरील फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर मनसेतर्फे खळ्ळ खट्ट्याक स्टाईलनं आंदोलनं केलं होते.

सोमवारी झालेल्या चर्चेत पोलीस आणि महानगरपालिका यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे फेरीवाले वाढलेयत. तर, फेरीवाल्यांपासून जवळपास 2 हजार कोटींचा हफ्ता घेतला जातो असा आरोप करत पोलिसांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version