मनसेचा इम्तियाज जलील यांच्याविरोधात मोर्चा

मनसेचा इम्तियाज जलील यांच्याविरोधात मोर्चा

छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात मनसेने मोर्चा काढला. संभाजीनगरमधील राजाबाजार येथील संस्थान मंदीर येथून मनसेकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला समर्थनार्थ मनसेच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. इम्तियाज जलीलविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना लाठीचार्ज करण्यात आला असून पोलिसांनी मनसेचा मोर्चा अडवला.

इम्तियाज जलील यांच्याविरोधात अनेक मनसैनिक संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरले. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला मनसेने समर्तन दर्शवले. यावेळी पोलिसांकडून कर्याकर्त्यांना अडवण्यात आले असून त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी मनसैनिकांनी जलील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version