जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 फुटीर नगरसेवकांबाबत सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.
या 6 नगरसेवकांनी त्यांच्या विरोधातील याचिकेबाबत आपले म्हणणे प्रत्यक्ष हजर राहून लेखी सादर करावे असं पत्र कोकण विभागीय आयुक्तांनं पालिकेद्वारे नगरसेवकांना पाठवलेय.
पालिकेनं हे पत्र शुक्रवारी नगरसेवकांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान 2 दिवस सुट्टी असल्यानं सोमवारी नगरसेवकांकडून य़ाबाबत खुलासा केला जाण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.