गुजराती पाट्यांविरोधात मुंबईत मनसेचे खळ-खट्याक

गुजराती पाट्यांविरोधात मुंबईत मनसेचे खळ-खट्याक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरला आहे. गुजराती पाट्यांविरोधात मुंबईत मनसेचे खळ-खट्याक आंदोलन केले.

 

दादर आणि माहिम परिसरातील दुकानांवर असणा-या गुजराती पाट्या मनसेने हटवल्या आहेत.

 

दादरमधील पु.ना.गाडगीळ ज्लेलर्सच्या दुकानावरील गुजरा भाषेतील बोर्ड मनसेकडून हटवण्यात आले आहेत. तसेच माहिमच्या शोभा हॉटेलची गुजराची पाटीही हटवण्यात

आली आहे.

 

महत्वाचं म्हणजे काही दिवसांपुर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरुन नाराजी व्यक्त केली होती. सोबतच लोकराज्य मासिक हिंदी आणि गुजराती भाषेतून काढण्यासही विरोध दर्शवला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version