प्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीच्या फंडासाठी मागणी केली आहे, ती मान्य नसल्याने प्लास्टिक केली असावी अशी शंका राज ठाकरे यांनी शिवसेनेवर आरोप करत उपस्थित केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. जोपर्यंत महापालिका आणि राज्य सरकार स्वतःची कामं नीट करत नाहीत, तोपर्यंत कुणीही दंड देऊ नये, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.
प्लास्टिक बंदीची जबाबदारी महानगर पालिकेची आहे पण आपली जबाबदारी झटकण्यासाठी पालिका लोकांवर प्लास्टिक बंदीचा निर्णय लादत आहे. रामदास कदम यांनी हा निर्णय घेतला पण नद्या ह्या दूषित आहेत पण त्याच काय झालं ?
अनेक कारखान्याचे पाणी नद्यांत सोडलं जात पिशव्यांचा कचरा होऊ नये यासाठी किती जास्त कचराकुंड्या लावल्यात असा प्रश्नही उपस्थित केला.
प्लास्टिकॉपासून इंधन नाशिकमध्ये बनवलं जात ज्याने कंपनीचे बॉयलर चालवता येतात जो प्रकल्प नाशिक मध्ये होतो तो इथे होऊ शकत नाही, रामदास कदम यांनी नाशिक मध्ये जाऊन प्लास्टिकचे नियोजन बघून यावे असंही ते यावेळी म्हणाले.
प्लास्टिक बंदीसारख्या मोठ्या निर्णयावर मुख्यमंत्री गप्प कसे, हा निर्णय सरकारचा आहे की फक्त विशिष्ट खात्याचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष रविंद्र मराठे यांच्यावरील कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात असल्याचा घणाघातही राज ठाकरे यांनी केला.
प्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल – रामदास कदम
‘आपले समुद्र प्लास्टिकचे बेट’ – आदित्य ठाकरे
प्लास्टिकच्या या वस्तुंवर बंदी नाही…
प्लास्टिकच्या या वस्तुंवर बंदी नाही…
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायम, उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.