मुंबई काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरण; संदीप देशपांडेंसह 8 जणांना पोलीस कोठडी

मुंबई काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरण; संदीप देशपांडेंसह 8 जणांना पोलीस कोठडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील काँग्रेसच्या कार्यलयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनसेच्या आठ जणांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये.

किल्ला कोर्टाने हा निर्णय दिलाय. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश छिल्ले, विशाल कोकणे, हरिश सोळुंकी, दिवाकर पडवळ यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीतच राहावं लागणारयं.

या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर मनसेने सर्जिकल स्ट्राईक केला, असे सांगत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

त्यानंतर पोलिसांनी देशपांडे यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर दंगल, घुसखोरी आणि नासधूस या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version