जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एलफिन्स्टन रेल्वेस्थानकामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक निष्पाप प्रवाशांचे बळी गेले. या रेल्वेहत्याकांडवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमिवर रेल्वेस्थानकाबाहेरील फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्यासाठी राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला दिलेली 15 दिवसांची डेडलाईन आज संपली आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ठाणे परिसरात फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड करत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.