मुंबई : मुंबई महानगर प्रदेश, सुरत, विशाखापट्टणम आणि वाराणसी या चार महानगर क्षेत्रांचा ‘ग्रोथ हब’ म्हणून विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात राबविण्यात येणार आहे. मुंबई महानगराचे सकल देशांतर्गत उत्पादन येत्या पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत निती आयोगाने केलेल्या शिफारशींची जलद अंमलबजावणी करून मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्याची जबाबदारी सनदी अधिकाऱ्यांवर सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. मुंबई महानगर प्रदेश, सुरत, विशाखापट्टणम आणि वाराणसी या चार महानगर क्षेत्रांचा ‘ग्रोथ हब’ म्हणून विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात राबविण्यात येणार आहे.
ग्रोथ हब समन्वय समितीचे सदस्य कोण ?
समितीवरील जबाबदारी काय ?
पर्यटन वाढीसाठी मढ, गोराई, अलिबाग आणि काशिद येथे पर्यटन केंद्र विकसित करणार
अटलसेतूला लागून ५०० एकर जागेवर थीम पार्क
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.