आमास्नी मंत्री कवा करताय?

आमास्नी मंत्री कवा करताय?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंतिम निकाल दिला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटात मंत्रिपदासाठी आता चुरस पाहायला मिळत असून आमास्नी मंत्री कवा करताय? असा सवाल शिंदे गटातील आमदार करत आहेत.

शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमाशी संवाद साधताना मंत्रिपदासाठीची इच्छा व्यक्त केली आहे. बच्चू कडू म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात काही अडचण नाही. त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. मंत्रिमंडळात माझी वर्णी कधी लागेल, ह सांगता येत नाही. मात्र, मुख्यमंत्री शिंदे दिलेला शब्द पाळतील, हे निश्चित आहे, असे कडू म्हणाले.

तसेच, मंत्रिमंडळ विस्तार हा जनतेसाठी महत्त्वाचा आहे. सध्या एका मंत्र्याकडे पाच-सहा खाती असल्यामुळे कारभार सांभाळताना अडचणी येत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करणे गरजेचे आहे. कोणत्याही आमदाराला मंत्रिपद द्या, मात्र विस्तार होणे महत्त्वाचे आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर विस्तार थेट २०२४नंतरच होईल, असे बच्चू कडू म्हणाले. तर, जनतेला काम करणारा मुख्यमंत्री मिळाला असून जनता खूश असल्याची प्रतिक्रियाही बच्चू कडू यांनी दिली आहे.

शिंदे समर्थक आमदारांमध्ये काय घडतय?

भरत गोगावले यांना मंत्रिपद हवे आहे.


संजय शिरसाट यांनाही मंत्रिपद हवे आहे.


विदर्भातून आशिष जैस्वाल मंत्रिपदासाठी जोर लावतायत.


महिलांमध्ये यामिनी जाधव आणि लता सोनावणे इच्छुक आहेत.


जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version