आमदार संग्राम थोपटे समर्थकांचा राडा, काँग्रेस कार्यलयाची तोडफोड

आमदार संग्राम थोपटे समर्थकांचा राडा, काँग्रेस कार्यलयाची तोडफोड

महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. पुण्यातील भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद मिळाले नाही.

यामुळे नाराज आमदार थोपटेंच्या समर्थकांनी राडा घातला.

थोपटे समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. समर्थकांनी कार्यालयातील खुर्च्यांची आणि टेबलांची तोडफोड केली.

या तोडफोडीत कार्यालयातील संगणक आणि इतर वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी थोपटे समर्थकांनी संग्राम थोपटे जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या.

तसेच थोपटे समर्थकांनी संजय जगताप आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

काँग्रेस भवनात तोडफोडीची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले. तोडफोड करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version