Dadar Viral Video : आंदोलनकर्त्या मुलीचा विनयभंग, त्या नराधमाचे चिड आणणारे कृत्य कॅमेऱ्यात कैद; त्वरीत कारवाईची रोहित पवारांची मागणी

Dadar Viral Video : आंदोलनकर्त्या मुलीचा विनयभंग, त्या नराधमाचे चिड आणणारे कृत्य कॅमेऱ्यात कैद; त्वरीत कारवाईची रोहित पवारांची मागणी

मुंबई : सध्या दिल्लीसह देशभरातील विविध शहरांमध्ये मोठ्या संख्येने तरुणवर्ग आंदोलनात उतरले आहेत. दरम्यान, मुंबईतील दादर येथे आंदोलन करणाऱ्या जमावावार पोलिसांची कारवाई सुरू असताना एका इसमाने आंदोलनकर्त्या मुलीला चुकीच्या पद्धतीने पकडल्याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टद्वारे शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ पाहून डोक्यात तिकीड गेल्याचे नमूद केले आहे. अशा पद्धतीने मुलींना पकडणे चुकीचे असून हा विनयभंग असल्याचे म्हटले आहे. तसेच या इसमाची ओळख पटवून तो पोलीस असल्यास त्याला तातडीने निलंबित करण्याची मागणी रोहित पवार यांनी पोस्टमध्ये केली आहे. सोबतच त्यांनी हा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. 

हेही वाचा : Sonam Wangchuk Hunger Strike : दिल्लीत मध्यरात्री मोठी घडामोडी! अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले

काय म्हटले आहे रोहित पवार यांनी –

हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम?
याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाण कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा.. आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा.
एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version