आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर

आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर

उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे. १७ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसीबीची नोटीस आलेले नितीन देशमुख ठाकरे गटाचे तिसरे आमदार आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना याआधी एसीबीनं नोटीस पाठवली होती. एकापाठोपाठ एका आमदाराला तपास यंत्रणा नोटीस पाठवत असल्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

१७ जानेवारी रोजी अमरावतीमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालमत्तेची माहिती देण्यास सांगितलं आहे. १७ तारखेला मी अमरावतीमधील कार्यालयात हजर राहणार आहे, असे नितीन देशमुख यांनी सांगितलं. पण, तक्रार देणाऱ्याचं नोटीसमध्ये नाव नाही. एखाद्या आमदाराला नोटीस पाठवल्यावर कुणाची तक्रार आहे, त्याचा उल्लेख असायला हवा. पण नोटीसमध्ये तसा उल्लेख नाही. माझ्याकडे कोणती संपत्ती अवैध आहे, त्याचाही उल्लेख नाही. १७ तारखेला अमरावतीमध्ये रितसर पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल, असे देशमुख म्हणाले आहे. तक्रारकर्त्याच्या नाव न सांगण्याच्या अटीवर मला नोटीस पाठवण्यात आली आहे. तक्रारकर्त्याचं नाव समोर आल्यानंतर सत्य समोर येईल. त्याला कुणी तक्रार द्यायला लावलं, हे समजेल… १७ तारखेला पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल, असेही देशमुख म्हणाले.

राजापूरचे आमदार राजन साळवी, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि आता बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे. १७ तारखेला नितीन देशमुख अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version