जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आ.बच्चू कडू

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आ.बच्चू कडू

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकीत आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे. तर उपाध्यक्ष पदी अभिजित धेपे यांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे संख्याबळ असतांना कॉग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना बच्चू कडूंनी चांगलाच धक्का दिला आहे ..

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मागील अनेक वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक हाती सत्ता होती. काँग्रेस मधील आजी-माजी पदाधिकारी यांनी ही सत्ता अनेक वर्षांपासून टिकून ठेवली होती. त्याच पार्श्वभूमीवर या पाच वर्षाच्या टर्ममध्ये प्रत्येकाला एक वर्ष अशा पद्धतीने काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला होता. यावर बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत आपले उमेदवार निवडून आणले होते.

बँकेचे पूर्वीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून राजीनामा दिला होता. त्यामुळे या ठिकाणी नव्याने निवडणुका घेण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनाचा प्रभाव या ठिकाणीही दिसून आला. आज झालेला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चांदुर रेल्वे मतदार संघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप विरुद्ध शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू अशी निवडणूक रंगली होती. यामध्ये बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version