जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अंबरनाथच्या स्वामीनगर भागात वाहणाऱ्या नाल्यात पडून एका अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. हा चिमुकला तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह नाल्यात सापडला. त्यामुळे या चिमुकल्य़ाचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आलेय. मात्र, हा मुलगा स्वामीनगरच्या धोकादायक पुलावरून नाल्यात पडल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी केलाय. पुलाचे काम न झाल्यानेच हा अपघात घडल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय.
पुलावर खेळत असताना तो नाल्यात पडल्याचा आरोप त्यांनी केलाय. या पुलाच्या कामासाठी पालिकेने 60 लाख मंजूर केले आहेत. मात्र, त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झालेच नाही असा आरोप त्यांनी केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.