Bhayandar Lunchbox Restrictions : कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता चक्क मेथीवर बंदी! हिरवी मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला दंड आकारत वहीवर मारला धक्कादायक शेरा

मिरा-भाईंदरमध्ये आहाराच्या मुद्यावरून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कांदा, लसूण, बटाटे यानंतर आता शाळेने विद्यार्थ्यांना डब्यात चक्क हिरवी मेथी आणण्यास मनाई केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Bhayandar Lunchbox Restrictions : कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता चक्क मेथीवर बंदी! हिरवी मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला दंड आकारत वहीवर मारला धक्कादायक शेरा

जैन धर्मियांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पर्युषण काळात मांसाहारासह कांदा,लसूण, गाजरचा खाण्यास शाळेत मनाई करण्यात आली आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेच्या अशा आदेशाच्या विरोधात चांगलाच संताप उसळला होता. त्यानंतर आता मिरा-भाईंदरमध्ये आहाराच्या मुद्यावरून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कांदा, लसूण, बटाटे यानंतर आता शाळेने विद्यार्थ्यांना डब्यात चक्क हिरवी मेथी आणण्यास मनाई केल्याचा प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा- Jalgaon Fire : भुसावळ MIDCमध्ये आगीचा थरार! कंपनीत धुराचे लोट, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलांची शर्थीची झुंज

पर्युषण पर्वाच्या काळात डब्यात कांदा, बटाटा, आले, बीट आणि गाजर यांसारख्या भाज्या आणल्यास 50 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, आता एका विद्यार्थ्याने मेथीची भाजी आणल्याने त्याच्याकडून 20 रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डब्यात मेथीची भाजी आणल्याने एका विद्यार्थ्याला दंड आकारून त्याला शाळेतील जेवण देण्यात आले आहे. या प्रकारावरून आता संताप व्यक्त केला जात आहे.

भाईंदरच्या इंद्रलोक भागातील एका खासगी शाळेने डब्यात हिरवी मेथी आणलेल्या एका विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला. काही समाजांमध्ये मेथी वर्ज्य असल्याने हा आदेश देण्यात आल्याचे समजते. ‘डब्यात हिरवी मेथी आणण्यास परवानगी नसून, विद्यार्थ्याला शाळेतून जेवण देण्यात आले आहे,’ असा शेरा वर्गशिक्षकांकडून संबंधित विद्याथ्यांच्या दैनंदिनीत देण्यात आला. तसेच त्याला 20 रुपये दंड आकारण्यात आला. या संदर्भात संबंधित शाळेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version