‘मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच’

‘मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच’

अजित पवार काही आमदारांसह राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या नऊ आमदारांचा शपथविधी झाला. मात्र अद्यापही या मंत्र्यांना खाते देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्य वाटप कधी होणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबद्दल अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात विचारले असता सुनील तटकरे यांनी तारीखच जाहीर केली आहे.

सुनील तटकरे म्हणाले, सत्तेत सामील झाल्यापासून अजित पवार दिल्लीला गेलेले नाही. हा काही तिढा वगैरे नाही. त्याचबरोबर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत लेले आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही काम करणार आहोत. त्याबाबतची जाणीव मनात ठेऊन काम करणे गरजेचे असते.

मला वाटते की, याबाबतचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या स्तरावर घेतील आणि आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर एकजुटीने काम करण्यासाठी बरोबर आहोत. उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराबाबत निर्णय झालेला तुमच्यासमोर येईल, असेही सुनील तटकरेंनी यावेळी आवर्जून सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version