नामांतराविरोधात एमआयएमचा मोर्चा

नामांतराविरोधात एमआयएमचा मोर्चा

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात एमआयएम आणि इतर काही संघटनांच्या वतीने आज शहरातील भडकलगेट ते आमखास मैदानापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. जिल्हा नामकरणाविरोधी कृती समितीचाही या मोर्चात सहभाग आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला आहे.

‘ज्या औरंगजेबाने हिंदूंचे मंदिरे तोडली, धर्मवीर संभाजी महाराज यांचे हाल करून वध केला. आशा औरंगजेबाचे नाव शहराला कशासाठी? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणारा एमआयएमचा आम्ही निषेध करतो. खासदार इम्तियाज जलील ही राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हा विरोध करत आहेत.’ असा आरोप अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरासाठी मतदान घेण्यावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाली की, खासदार जलील हे काय पंतप्रधान किंवा राष्ट्रपती आहे का? की त्यांनी मागणी केली म्हणून ती पूर्ण करावी. असा टोलाही आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना खासदार इम्तियाज जलील यांना लगावला आहे.

मुस्लिम मंताचे धुवीकरण डोळ्यासमोर ठेवून काढलेल्या या मोर्चा आम्ही महत्व देत नाही. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लिमांची मते काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडे जाऊ नये यासाठी केलेला हा सगळा खटाटोप असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला होता, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version